
14 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड
जळगाव | प्रतिनिधी
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) यांच्या वतीने आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या अंतर-जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ मेपासून शिरपूर येथील मिलिटरी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरू होणार असून, अंश बबन आव्हाड याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुख शेख यांनी २३ मे रोजी दुपारी १२ वाजता अधिकृतरीत्या संघाची घोषणा केली. संघ २४ मे रोजी शिरपूरकडे रवाना होणार आहे.
याप्रसंगी सचिव फारुख शेख यांच्यासह कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, आमिर शेख, भास्कर पाटील, मनोज सुरवाडे आणि निवड समिती सदस्य नितीन डेव्हिड, थॉमस डिसोझा, उदय फालक, राहील अहमद, हिमाली बोरोले, गुंजा विश्वकर्मा, वर्षा सोनवणे, इमरान शेख, तौसिफ शेख आणि वसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जिल्हा संघातील खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे:
अंश बबन आव्हाड (कर्णधार), राशिद तारिक शेख, पार्थ चंद्रशेखर पाटील, आर्यन पंकज धावरे, शौंक ब्रिजेश लाहाटी, बिलाल वसीम शेख, चैतन्य स्वप्नील पाटील, अरहम आसिफ विच्छी, एकांश दीपक तिवारी, अर्णव नितीन पाटील, रेहान आझाद पटेल, पियुष दिवाकर भिरूड, एकांश रवींद्र ढाके, अम्मर शज्जाद शेख, शेजाद आरिफ खा, गुफ्रान जोहेब सय्यद, आमेर रोहन विसाव, अथर्व गजानन पाटील.
राखीव खेळाडू:
अबुजार जलाल, समर सतीश चंदूध, तनुष खंबायत.
या संघाचे प्रशिक्षक नितीन डेव्हिड तर व्यवस्थापक वसीम शेख असणार आहेत. जिल्हा संघाकडून उत्कृष्ट खेळाची अपेक्षा असून, स्पर्धेत दमदार कामगिरी करून जळगावचे नाव राज्यभर उजळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.