खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात १५ वर्षीय मुलीचे अपहरण;   संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात १५ वर्षीय मुलीचे अपहरण;   संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील कठोरा-किनोद गावादरम्यान २१ मे रोजी सकाळी १० वाजता एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी संशयित विनोद प्रकाश बाविस्कर (रा. सावखेडा) याच्याविरुद्ध २२ मे रोजी दुपारी ३:३० वाजता अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पेट्रोलपंपाजवळ असताना संशयिताने तिला आमिष दाखवून फूस लावले आणि पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु ती सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button