9 पेक्षा जास्त SIM Card वापरले तर होईल, सर्व सीम कार्ड बंद असे दूरसंचारचे आदेश.

Khandesh times News नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांकडे एकाहून अधिक मोबाइल SIM Card असल्याचे दिसून येते . मात्र , अशा लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे . नऊपेक्षा जास्त SIM Card ठेवणाऱ्या ग्राहकांची पडताळणी करण्यात येणार आहे . पडताळणी न झाल्यास SIM Card बंद करण्यात येतील . केंद्रीय दूरसंचार विभागाने याबाबत आदेश दिले आहेत . एका व्यक्तीला ९ SIM Card वापरण्याची परवानगी आहे . जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये ६ SIM Card वापरता येतात .परवानगीपेक्षा अधिक SIM Card असणाऱ्या ग्राहकांना सेवा सुरू ठेवण्यासाठी इच्छेनुसार SIM Card निवडता येतील . उर्वरित मोबाइल क्रमांक बंद केले जातील . जास्त SIM Card आढळल्यास सर्व सीम कार्डसाठी ग्राहकाची पडताळणी करण्यात येईल .

यामुळे घेतला निर्णय :

आर्थिक गुन्हे , आपत्तीजनक कॉल्स , ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत . त्यांचा तपास करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे . नियमांनुसार वापर होत नसलेले सर्व मोबाइल क्रमांक बंद करुन ते डेटाबेसमधून हटविण्याचे आदेश सर्व कंपन्यांना देण्यात आले आहेत . यामुळे मोबाइलचा देशविरोधी कारवाया व अवैध धंद्यासाठीचा वापर बंद होईल .

Leave a Reply

Your email address will not be published.