
राहत्या घरात गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
जळगाव प्रतिनिधी शहरातील देवेंद्र नगर परिसरात रविवारी (२६ मे) दुपारी शबना जावेद तडवी (वय ४४) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, रामानंद नगर पोलीस तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी शबना यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.