इतर

सावदा येथील ताजुशरिया नगरात कचरा व गटारी सफाईबाबत तक्रार

सावदा येथील ताजुशरिया नगरात कचरा व गटारी सफाईबाबत तक्रार

माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचा ठेकेदारांना इशारा

सावदा (प्रतिनिधी शेख मुख्तार) – ताजुशरिया नगर येथील कचरा व गटारींच्या साफसफाईचा प्रश्न सुटत नसल्याने स्थानिक नागरिकांनी सावदा नगरपरिषदेत धाव घेतली. यावेळी शेख इब्राहिम (रा. ताजुशरिया नगर) यांनी  तक्रारदार म्हणून निवेदन सादर केले. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, फरिदभाई, पत्रकार मोहसिन, पत्रकार प्रवीण, ड्रायव्हर शेख चांद, मोहम्मद गौस मोमीन, इरफानभाई, बाबू ज्यूसवाले, पांडा भाई, साबीर कुरेशी, मोईनभाई व परिसरातील अनेक रहिवासी उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी यावेळी ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गेल्या १५ वर्षांपासून केवळ लोकांचे फोटो काढणे आणि भावनांशी खेळणे हेच इथल्या लोकप्रतिनिधींचं काम सुरू आहे. मी मात्र लोकांच्या भावनांना समजून घेणारा आहे, केवळ दिखावा नाही तर कृती हवी आहे.”

त्यांनी पुढे अशी मागणी केली की, लवकरात लवकर या तक्रारीची योग्य दखल घेऊन समस्या सोडवावी. अन्यथा संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button