इतर

दुचाकीच्या हँडलला लावलेली तीन लाख रुपये असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लांबवली

दुचाकीच्या हँडलला लावलेली तीन लाख रुपये असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लांबवली

अमळनेर | प्रतिनिधी शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि खते खरेदीसाठी बँकेतून तीन लाख रुपये काढून दुचाकीच्या हँडलबारला टांगलेल्या पिशवीवर अज्ञात चोरट्याने हात साफ केल्याची धक्कादायक घटना अमळनेर शहरात घडली. मंगळवारी (१० जून) दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली असून, शेतकऱ्याच्या मेहनतीच्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वासरे येथील शेतकरी शिवाजी भानुदास पाटील (वय ५९) यांचे अमळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. मंगळवारी ते शेतीसाठी आवश्यक बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बँकेतून ३ लाख रुपये काढले व हे पैसे निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवले.

बँकेतून बाहेर पडत त्यांनी ही पिशवी दुचाकीच्या हँडलबारला टांगली आणि बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी गेले. त्यानंतर विजय शॉपीसमोरील फळांच्या हातगाडीजवळ दुचाकी लावून आंबे खरेदी करत असतानाच चोरट्याने त्यांच्या नकळत पिशवी लंपास केली. आंबे घेऊन परतल्यावर पिशवी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेने पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button