इतर
चहाची गाडी लावल्याच्या वादातून वृद्धाला बंदुकीने मारण्याची धमकी

चहाची गाडी लावल्याच्या वादातून वृद्धाला बंदुकीने मारण्याची धमकी
जळगाव प्रतिनिधी चहाची गाडी जवळ लावल्याच्या कारणावरून शहरातील एबी कॉलनीतील रहिवासी सैय्यद हैदर अली बालमअली (वय ६५) यांना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
सैय्यद हैदर अली यांच्या म्हणण्यानुसार, संशयित मोनल विजय रतवेकर (वय ३०, रा. गेंदालाल मिल) यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला बंदुकीने ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, “तुझी मुलगी पोलिस खात्यात कशी नोकरी करते, तीला बघून घेतो,” असे म्हणत गंभीर इशारा दिला.
ही घटना घडल्यानंतर सैय्यद हैदर अली यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पंकज सपकाळे करत आहेत.
