इतर

चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक; चार दिवसांत ५ हजारांची झेप

चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक; चार दिवसांत ५ हजारांची झेप

जळगाव – चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीला सोमवारी आणखी गती मिळाली. चार दिवसांत तब्बल ५ हजार रुपयांनी वाढ झाल्यानंतर सोमवारी चांदीच्या दरात पुन्हा १ हजार रुपयांची वाढ झाली असून प्रति किलो दर १,१४,००० रुपये (जीएसटीसह ₹१,१७,४२०) वर पोहोचले. हा दर चांदीचा आजवरचा सर्वकालीन उच्चांक ठरला आहे.

दरवाढीत चांदीपुरतेच नव्हे, तर सोन्याचेही दर वाढले असून सोमवारी प्रति तोळ्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

अमेरिकेचे बदलते कर धोरण आणि इस्रायल-हमास युद्धातील तणाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्या-चांदीकडे वाढल्याचे मत आंतरराष्ट्रीय बाजार अभ्यासक आदित्य नवलखा यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button