इतर

देणगीपेक्षा गरजूंच्या जीवनातील  आनंद महत्त्वाचा – कल्याण बॅनर्जी

देणगीपेक्षा गरजूंच्या जीवनातील  आनंद महत्त्वाचा – कल्याण बॅनर्जी
गांधीतीर्थ येथे रोटरी जळगावचे पदग्रहण उत्साहात
जळगाव – सामाजिक कार्यासाठी किती देणगी किंवा आर्थिक निधी दिला यापेक्षा गरजू व्यक्तींच्या जीवनात किती आनंद निर्माण झाला हे महत्त्वाचे आहे असे रोटरीचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांनी प्रतिपादन केले.
 जैन हिल्स, गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात झालेल्या रोटरी क्लब जळगावच्या ७६ व्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन, सहप्रांतपाल डॉ.अपर्णा भट – कासार यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना बॅनर्जी यांनी कलकत्ता येथे देशातील रोटरीचा पहिला क्लब स्थापन झाला असून आजची रोटरी सदस्यांची संख्या पाहता सर्वात वेगाने वाढणारी ही स्वयंसेवी संस्था आहे असे सांगून सेवाकार्य करताना संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक दर्जा गरजेचा आहे असे ते म्हणाले. मराठी भाषा, संस्कृती याविषयी आपुलकी व्यक्त करत त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी हे रोटरी वर्ष परिवर्तनाचे असून रोटरी सेवेसाठी आहे असे सांगितले. अशोक जैन यांनी गिरीश कुलकर्णी यांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता आज रोटरीचा अध्यक्ष होऊ शकतो याबद्दल आनंद व्यक्त करून रोटरॅक्ट या रोटरीच्या युवा संघटनेत केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत रोटरी क्लब जळगावने मानद सदस्यत्व दिल्याबद्दल मनोगतात आभार व्यक्त केले.
          मावळते अध्यक्ष ॲड. सागर चित्रे यांनी गिरीश कुलकर्णी यांना अध्यक्ष पदाची सूत्रे दिली तर पराग अग्रवाल यांनी सुभाष अमळनेरकर व पंकज व्यवहारे यांना सचिवपदाची सूत्रे दिली.ॲड. सागर चित्रे यांनी कार्य अहवाल सादर करून सूत्रसंचालन केले. अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून कार्यकारणीची घोषणा केली. त्यांच्या मातोश्री सुनंदा कुलकर्णी यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.
प्रारंभी मृण्मयी कुलकर्णी हिने कथक नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली. यावेळी अजिंठा या कॅप्टन मोहन कुळकर्णी संपादित क्लब बुलेटीनच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
 परिचय डॉ. प्रदीप जोशी व डॉ.अपर्णा भट – कासार यांनी करून दिला. आभार ॲड. हेमंत भंगाळे यांनी मानले. कार्यक्रमात जितेंद्र ढाके यांनी रोटरी फाउंडेशनच्या कार्यासाठी तीन लाख रुपयांचा तर क्लबतर्फे करण्यात येणाऱ्या मोतीबिंदूंच्या मोफत शस्त्रक्रियांसाठी कवरलाल संघवी यांनी एक लाख रुपयांचा आणि विजय जोशी यांनी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
पदग्रहण सोहळ्यास माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, राजीव शर्मा, राजेंद्र भामरे, डॉ.आरती व डॉ. संजीव हुजूरबाजार, इनरव्हीलच्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन संगीता घोडगावकर, सुदर्शन अय्यंगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button