खान्देशगुन्हेजळगांव

किराणा दुकानाच्या ड्रॉवरमधून एक लाख तीस हजार रुपयांची रोकड लंपास

भुसावळ;- तालुक्यातील साकेगाव येथील श्रीराम नगर ,एमआयडीसी येथे एका किराणा दुकानातून अज्ञात चोरट्याने ड्रावर मधून एक लाख तीस हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार 31 जुलै 2023 रात्री 10 ते 1 ऑगस्ट 2023 पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडला .

याप्रकरणी ६ ऑगस्ट रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सोपान रामा बाविस्कर वय 38 यांचे सद्गुरु नावाचे किराणा दुकानातून अज्ञात चोरट्याने ड्रायव्हर मधून एक लाख तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सोपान बाविस्कर यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला ६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी अमोल पवार करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button