इतर

जळगावात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या हद्दपार सराईत गुन्हेगाराला अटक!

जळगावात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या हद्दपार सराईत गुन्हेगाराला अटक!

जळगाव, (प्रतिनिधी): शहरात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रामानंद नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे

२१ जुलै २०२५ रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत एक व्यक्ती हातात धारदार कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणाळकर यांनी तात्काळ पोहवा सुधाकर चौधरी, पोना अतुल चौधरी आणि योगेश भिल यांना सोबत घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरात गस्त घालून सापळा रचला. यावेळी एक इसम हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवत असताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव समाधान हरचंद भोई (वय ३२, रा. साखरडे, रामानंद नगर, जळगाव) असे सांगितले.

हा सराईत गुन्हेगार जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार चाळीसगाव तालुक्यातून हद्दपार केलेला होता. हद्दपार असतानाही तो जळगावात येऊन अशाप्रकारे दहशत माजवत असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी समाधान भोई याला तात्काळ ताब्यात घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये CCTNS गु.र.नं. २६६/२०२५ भारतीय दंड संहिता कलम १४२ सह शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुधाकर अंभोरे हे करत आहेत.

या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनवणाऱ्या गुन्हेगारांना आळा घालण्यास पोलिसांना यश आले असून, नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button