जळगावात ‘एक शाम देश के नाम’ कार्यक्रमात पिंप्राळा झोनने मारली बाजी

खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माहेश्वरी सभा, बालाजी पेठ, भवानी पेठ, आणि बळीराम पेठ परिसराने आयोजित केलेल्या ‘एक शाम देश के नाम’ या जिल्हास्तरीय देशभक्तीपर कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. आदित्य फार्म येथे झालेल्या
या कार्यक्रमात सुमारे १००० समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात देशभक्तीवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि ५० वर्षांवरील व्यक्तींसाठी फॅन्सी ड्रेस, समूहगीत गायन, जोडी नृत्य आणि समूहनृत्य अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये जवळपास २०० स्पर्धकांनी भाग घेतला. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि मेडल्स देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आदित्य फार्म, निकम अँड लाठी असोसिएट्स, आणि सुप्रीम इंडस्ट्रीज होते. माजी महापौर नितीन लड्डा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात शिव लाठी यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून, प्रत्येक नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे हा आहे.
पिंप्राळा झोनचे यश
या कार्यक्रमातील समूहनृत्य स्पर्धेत पिंप्राळा झोनने प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. अध्यक्ष मयूर सोमानी, सचिव वितेश भदादा, आणि वीणा सोमाणी यांनी या यशासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच अजय शिंदे यांचे नृत्यासाठी मार्गदर्शन लाभले.
पिंप्राळा झोनच्या विजयी संघात सपना अजमेरा, दीपिका अजमेरा, रिंकू मालिवाल, भाविका मालुधाणे, श्रेया सोमानी, नेहा जाखेटे, नेहा जावर, मयूर सोमानी, दर्शन अजमेरा (राजगुरु), अरुणा अजमेरा (गांधीजी), नैतिक कोठारी (सुखदेव), कैवल्य पोरवाल (भगतसिंग), दर्शना जाखेटे (झाशीची राणी) आणि हंशिका झंवर (सुभाषचंद्र बोस) यांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मन योगेश मालिवाल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली लाहोटी आणि जयश्री लाठी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रमोद झंवर, रमण लाहोटी, शिव लाठी, संतोष समदाणी, राधेश्याम सोमानी, योगिता दहाड, आनंद बिर्ला आणि सारिका मंडोरा यांचा मोलाचा वाटा होता.





