खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

निमदाळे धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; बोळे गावात शोककळा

पारोळा,  : पारोळा तालुक्यातील बोळे गावाजवळ असलेल्या निमदाळे धरणात बुडून सोनल रवींद्र पाटील (वय २०, रा. बोळे) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

सोनल पाटील हा धरणाजवळ फिरत असताना अचानक पाय घसरून खोल पाण्यात पडला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आणि परिसरातील गावकऱ्यांनी तात्काळ त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत सोनल बेशुद्ध झाला होता.

त्याला तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे बोळे गावावर शोककळा पसरली आहे. एका होतकरू तरुणाच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सोनलचा भाऊ भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर सोनवणे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button