
झुडपांच्या आडोशात सुरु असलेला जुगाराचा डाव उधळला ; १५ जणांना अटक, १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
कासोदा पोलिसांची कारवाई
एरंडोल प्रतिनिधी तालुक्यातील जवखेडे सिम गावातील गालापूर रोडलगत काटेरी झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकून १५ जणांना अटक केली असून, १ लाख २१ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. प्रदीप पाटील, पो.कॉ. समाधान तोंडे, निलेश नाना गायकवाड व योगेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही छापेमारी केली. गालापूर रोडलगत असलेल्या झुडपांमागे काही इसम जमिनीवर बसून पत्त्यांचा डाव रंगवत होते. पोलिसांनी पथकासह पायी जाऊन अचानक छापा टाकला. या वेळी ६ हजार ३९० रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : सोनू धाकु भिल (५०), विरभान श्रावण भिल (४०), राहुल संतोष सोनवणे (२६), प्रवीण वसंत सोनवणे (३९), संतोष माधव सोनवणे (३०), सुनील दगा ठाकरे (३५), मंगिलाल भाईदास चव्हाण (४५), रतन धाकु भिल (६०), अशोक गोविंदा पाटील (५४), सचिन बापू पवार (३७), कांतीलाल महादू सोनवणे (३८), उत्तम बालाअप्पा जेढे (५०), समाधान बापू पाटील (३५), संभाजी महारु पाटील (५८), सुनील सीताराम वाघ (४८) – सर्वजण जवखेडे सिम, ता. एरंडोल येथील रहिवासी आहेत.या आरोपींवर कासोदा पोलीस ठाण्यात पोकॉ. ५०१ दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कासोदा पोलिसांकडून सुरू आहे.





