
एमआयडीसी पोलिसांची कारवाई – पांडे चौकातून चोरलेली दुचाकी हस्तगत
जळगाव – शहरातील पांडे चौक परिसरातून जिल्हा रुग्णालयात गेलेल्या तरुणाची दुचाकी चोरुन नेणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. अनुराग जाधव (रा. रामेश्वर कॉलनी) असे अटकेतील संशयिताचे नाव असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
पांडे चौकात उभी असलेली दुचाकी (एमएच १९ बीआर ८५३८) चोरल्यानंतर संशयित अनुराग जाधव ती वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ विजयसिंग पाटील, पोना प्रदीप चौधरी व विशाल कोळी यांच्या पथकाने सापळा रचून अनुरागला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोना प्रदीप चौधरी करीत आहेत.





