सामाजिक

सावदा नगरपालिकेकडे नागरिकांसाठी विशेष सुविधांसाठी ओरिजनल पत्रकार संघाची मागणी

सावदा l रावेर l शेख मुख्तार दि १९ ऑगस्ट २०२५ l ओरिजनल पत्रकार संघ, सावदा यांनी सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पालिकेतील प्रशासकीय सुधारणांसाठी चार प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी सर्व मागण्या लागलीच मान्य करून प्रशासनाला सूचना दिल्या.

१.दाखल्यांच्या शुल्काचा फलक: कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क आकारले जाते, याची माहिती दर्शवणारा फलक पालिकेच्या कार्यालयात लावण्यात यावा.

२.नेमप्लेट्सची व्यवस्था: प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या टेबलवर त्यांचे नाव आणि पद दर्शवणारी नेमप्लेट लावण्यात यावी.

३.कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक: सर्व कर्मचाऱ्यांचे नाव आणि मोबाइल क्रमांक असलेला होर्डिंग बोर्ड कार्यालयात लावण्यात यावा.

४.हालचाल पुस्तक: प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी हालचाल पुस्तक ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.

निवेदन सादर करताना मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या समस्यांचे निराकरण करण्याची खात्री दिली. ते म्हणाले, “नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुधारणा लवकरात लवकर अमलात आणल्या जातील.”

या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास सखाराम भारंबे, उपाध्यक्ष दिलीप रामभाऊ चांडेलकर, सचिव शेख फरीद शेख नुरोद्दीन, कार्याध्यक्ष युसुफ शहा सुपडू शहा, खजिनदार कैलास भाऊलाल लवंगडे, प्रसिद्धी प्रमुख अजहर खान अजमल खान, दीपक रमेश श्रावगे, शेख मुखतार शेख अरमान, प्रशांत धोंडू सरवदे आणि मिलिंद अरुण कोरे हे पत्रकार उपस्थित होते.

ओरिजनल पत्रकार संघाने सावदा पालिकेच्या प्रत्येक विभागात नागरिकांना येणाऱ्या अडचणींची पाहणी करताना प्रशासकीय सुधारणांची गरज अधोरेखित केली. या मागण्यांच्या पूर्ततेमुळे पालिकेची कार्यप्रणाली अधिक पारदर्शक आणि नागरिकस्नेही होईल, असा विश्वास पत्रकार संघाने व्यक्त केला. व सर्व मागण्या मान्य केल्याने मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचे ओरिजनल पत्रकार संघाकडून आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button