खान्देशगुन्हेराजकीयशासकीयसामाजिक

गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करण्याचे आवाहन; शांतता समितीच्या बैठकीत एकतेचा संदेश

गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करण्याचे आवाहन; शांतता समितीच्या बैठकीत एकतेचा संदेश

सावदा शेख मुख्तार I गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण सर्व समाजबांधवांनी एकत्रित सहभागाने, एकोप्याने, आनंदाने आणि भाईचारा जपत साजरे करावेत, जेणेकरून गणेश उत्सव हा खऱ्या अर्थाने आनंदोत्सव बनेल, असे आवाहन फैजपूर/मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) अनिल बडगुजर यांनी केले. सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

 

सावदा येथील जेहरा मॅरेज हॉलमध्ये आयोजित या बैठकीस मुख्याधिकारी भूषण वर्मा, रावेर तहसीलचे नायब तहसीलदार आर. डी. पाटील, विद्युत महावितरणचे अभियंता गणेश महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाविस्कर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे, उपनिरीक्षक राहुल सानप, सी. आर. जाफर हुसेन आदी उपस्थित होते.

सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सण-उत्सव साजरे करताना सर्व समाजबांधवांनी एकमेकांच्या धर्माचा आदर राखावा आणि कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. बैठकीत सावदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सैय्यद असगर, सुरज सिंग परदेशी, डॉ. प्रियदर्शिनी सरोदे, नंदाताई लोखंडे, सिमरन वानखेडे यांच्यासह हिंदू-मुस्लिम शांतता समितीचे सदस्य, शेख पुरा पंच कमिटी, सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार, महिला दक्षता मंडळाचे पदाधिकारी यांनी उपस्थितांना हरतालिका, गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या.

गणेश मंडळांचे भक्त आणि मुस्लिम कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण हर्षोल्लासात आणि गुण्यागोविंदाने साजरे करण्याची ग्वाही दिली. सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मान्यवर या बैठकीस उपस्थित होते. यावेळी फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे पो. कॉ. महेश मोगरे, गृहरक्षक दलाचे कर्मचारी आणि विविध दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महाजन यांनी केले, तर उपनिरीक्षक अमोल एन. गर्जे यांनी आभार मानले. बैठकीस पो. कॉ. निलेश बाविस्कर, गोपनीय शाखेचे पो. कॉ. राहुल येवले, पो. कॉ. राजेंद्र बोदडे, पो. कॉ. मयूर पाटील यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीतून सर्व समाजबांधवांना एकता, शांतता आणि सौहार्द राखून सण-उत्सव साजरे करण्याचा संदेश देण्यात आला. गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सावदा परिसरात सामाजिक एकता आणि बंधुभाव वृद्धिंगत होण्यास या बैठकीमुळे मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button