खान्देशगुन्हेजळगांव

फारुक शेख हे लाभार्थी नव्हे – उच्च न्यायालय

औरंगाबाद खंडपीठाने मुश्ताक सालार यांची याचिका फेटाळली

जळगाव ;– फारुक शेख यांनी विश्वस्तांनी पारित केलेल्या ठरावाप्रमाणे कार्यवाही केली असून ते व्यक्तिशः मनपाकडून मिळालेल्या अनुदानाचे लाभार्थी नसून मुस्लिम इद गाह व कब्रस्तान ट्रस्ट ही लाभार्थी आहे.  तसेच मनपाने दिलेली रक्कम ही ट्रस्टच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे.  एवढेच नव्हे तर इदगाह ट्रस्टतर्फे फारुक शेख यांनी मनपाशी केलेला पत्रव्यवहार हा मनपाच्या ताब्यात असल्याने व ते सर्व रेकॉर्ड पोलिसांनी जप्त केले असल्याने सेशन कोर्ट जळगाव यांनी फारुक शेख यांना मंजूर केलेला अटकपूर्व जामीनमध्ये कोणताही बदल करणे योग्य नसल्याने मुश्ताक सालार यांनी फारुक शेख यांना दिलेला जामीन रद्द करून त्यांना अटक करावी या आशयाचा दिलेला अर्ज नामंजूर करण्यात येत आहे, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश आर एम जोशी यांनी दिले. सदर प्रकरणी फारुक शेख यांच्या वतीने जळगावचे उच्च न्यायलयातील वकील अँड. जितेंद्र पाटील यांनी बाजू मांडली.

प्रकरणाची थोडक्यात हकीगत

कोविड काळात मृत्यू पावलेल्यांना अंतिम संस्कार साठी मनपा तर्फे त्यांच्या अंत्यविधीसाठी झालेल्या खर्चाची परिपूर्ती देण्यात येत असल्याने शासनाच्या नियमानुसार जळगाव मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट तर्फे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी त्या अनुदानासाठी मनपाकडे प्रस्ताव सादर केला होता. ट्रस्टच्या विश्वस्तांनी वेळोवेळी ठराव पारित करून फारुक शेख यांना हक्क दिलेले होते त्यानुसार तो प्रस्ताव सादर केला गेला होता. प्रस्तावाची सखोल चौकशी होऊन सुमारे दीड वर्षानंतर मनपा जळगाव ने कब्रस्तान ट्रस्टच्या बँक अकाउंट ला सुमारे १९४०००/- रुपये नेफ्ट द्वारे ट्रान्सफर केले होते.

सदर अनुदान फारुक शेख यांनी मनपाची व मृत पावलेल्या नातेवाईकांची दिशाभूल करून खोटे कागदपत्र सादर करून घेतले असल्याची तक्रार जळगाव नगरीचे माजी उपमहापौर करीम सालार यांचे पुतणे मुश्ताक अहमद सालार यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे केली होती. त्याच दिवशी फारुक शेख यांना जळगाव सेशन कोर्टातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता व त्यानंतर तो जामीन नियमित केला होता.

सालार कुटुंबिया चे समाधान न झाल्याने मुश्ताक अहमद सालार यांनी औरंगाबाद खंडपीठात सदर जामीन रद्द साठी कॅन्सलेशन ऑफ बेल याचिका क्रमांक ३०/२०२३ दाखल केली होती. त्यावर दिनांक १ऑगस्ट रोजी आर एम जोशी यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता फारुक शेख यांच्या वतीने एडवोकेट जे बी पाटील यांनी युक्तिवाद करून सदर प्रकरणी सालार यांची याचिका कशी अयोग्य आहे हे न्यायालयास कागदपत्रा वरून पटवून दिल्याने सदर याचिका फेटलण्यात आलेली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button