खान्देशजळगांवधार्मिकसामाजिक

सरकार कि आमद मरहबा, मरहबा या मुस्तफ़ा मरहबा ; जुलुसे ईद – ए – मिलाद उन नबी उत्साहात 

सरकार कि आमद मरहबा, मरहबा या मुस्तफ़ा मरहबा ; जुलुसे ईद – ए – मिलाद उन नबी उत्साहात 

जळगाव प्रतिनिधी I दरसालाबाद प्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांचा पवित्र, महत्वपूर्ण व मोठा सण जशने ईद – ए – मिलाद उन नबी ( प्रेषित जयंती ) निमित्त जुलुसे ईद – ए – मिलाद उन नबी ( शोभा यात्रा ) चे  दि. 8 सोमवार रोजी चे सून्नी जामा मस्जिद भिलपुरा, मरकझी जुलुसे ईद – ए – मिलाद उन नबी कमिटी जळगांव व तमाम आशिकाने, गुलामाने रसूल, व अहेले सुन्नत वल जमात शहरे जळगांव तर्फे आयोजन करण्यात आलेले होते.
जुलूस ची सुरवात सकाळी 10:30 वाजता भिलपुरा येथील इमाम अहेमद रझा चौकात होऊन पुढे घाणेकर चौक, सुभाष चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, नेरी नाका, एस. टी. वर्कशॉप समोरील मुस्लिम कब्रस्तानात येऊन दुपारी 01:00 दरम्यान सांगता करण्यात आली. या प्रसंगी ” सरकार की आमद मरहबा, रसूल की आमद मरहबा, मरहबा या मुस्तफा मरहबा, नार ए तकबीर अल्लाहू अकबर, नार ए रिसालत या रसूल अल्लाह, ताहा की आमद मरहबा, यासिन की आमद मरहबा अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. या प्रसंगी सर्वांच्या हातात विविध इस्लामी ध्वज होते, जुलूस च्या अग्रभागी घोडेस्वार मोठे इस्लामी ध्वज घेऊन चालत होते. तसेच अग्रभागी सजविलेल्या बग्गीत ( घोडागाडी ) सर्व धर्मगुरू बसलेले होते. जुलूस सुभाष चौकात आल्यावर परंपरागत पद्धतीने अझान देण्यात आली. सै. अयाज अली नियाज अली यांनी सर्व पोलीस दल, व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले, सुभाष चौकात जिल्हा पोलीस दलातर्फे जुलूसचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डी. वाय. एस. पी. नितीन गणापुरे, दीपक जोशी यांनी मुस्लिम बांधवांचे स्वागत केले.

जुलूसचे विविध ठिकाणी विविध संस्थे व लोकांतर्फे स्वागत करण्यात येत होते. तसेच विविध ठिकाणी खाद्य पदार्थ, केळी, पाणी, नानखताई, पोहे चे वाटप करण्यात येत होते
जुलूस कब्रस्तानात आल्यावर सलातो सलाम, नाते पाक, दरूद शरीफ चे पठन करून शेवटी विश्वशांती साठी दुआ प्रार्थना करून फातिहा पठन करण्यात आली.

जुलूसचे ची सदारत (नेतृत्व ) मौलाना जाबीर रझा यांनी केली.जुलूसचे कयादत ( मार्गदर्शन ) मौलाना वासेफ रझा यांनी केली. जुलूसची झेरे निगरानी ( संचालन ) सै. अयाज अली यांनी केले.

या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मौलाना वासेफ रझा, मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना युनूस रझा, मौलाना रफिक रझवी, सय्यद जावेद, कामिल खान, अमान बिलाल, रईस चाँद, काशीफ टेलर, इमाम भाया, सय्यद उमर, शाकीर चित्तलवाला, सिकंदर रझवी, यांसह सुमारे पंचवीस हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button