खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

वाईन शॉप व्यावसायिकाला धमकावून पैसे चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक

भुसावळ येथे वाईन शॉपमधील चोरांना अटक

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील मधुर वाईन शॉपमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावून पैसे चोरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ८ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक पंकज घनशाम जंगले (वय ४५) हे वाईन शॉपमध्ये गेले असताना, दोन तरुणांनी दारूचे क्वार्टर घेतले आणि त्याचे पैसे देण्यास नकार दिला. त्यांनी पंकज जंगले यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून त्यांच्याकडील २२०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि तेथून पळून गेले.

या घटनेची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकों/विजय नेरकर, पोकों/प्रशांत सोनार, पोकॉ योगेश माळी, पोकॉ महेंद्र पाटील, पोकों/अमर अढाळे, पोकॉ/भुषन चौधरी, पोहेकॉ रवींद्र भवसार पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी आरोपींना कंडारी पीओएच कॉलनी येथून ताब्यात घेतले. ऋतिक भगवान निदाने (वय २५, रा. वाल्मीक नगर, भुसावळ) आणि मिहीर दिलीप तायडे (वय २५, केशव नगर, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेल्या रकमेपैकी ७८० रुपये जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button