
जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रामानंदनगर पोलिसांनी गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसासह अटक केली.
जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी अलीकडेच सर्व पोलिस ठाण्यांना गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या व सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या सूचनांनुसार, रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी पिंप्राळा परिसरात कारवाई करत महेंद्र उर्फ दादू सपकाळे याला गावठी कट्टा व एक जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले. आरोपीच्या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रामानंदनगर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये PSI सचिन रानशेवरे, पो.हे.का. जितेंद्र राजपूत, सुधाकर अंबोरे, जितेंद्र राठोर, सुशील चौधरी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेयांनंद साळुंके, योगेश बारी, विनोद सूर्यवंशी व गोविंदा पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI सचिन रानशेवरे करीत आहेत.





