
अधिक नफ्याचे अमिष दाखवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ५.६ लाखांचा ऑनलाइन गंडा
जळगाव: कंपनीत गुंतवणुकीवर १८ लाख रुपये नफा मिळाल्याचे खोटे आश्वासन देऊन अमळनेर येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश जानकीराम बडगुजर (वय ७९) यांना ऑनलाइन ठगांनी ५ लाख ६० हजार रुपयांना गंडवले. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकाश बडगुजर हे एसटी महामंडळातून निवृत्त झाले असून, अमळनेर येथे राहतात. १ मे २०२५ रोजी रिधी वमवा नावाच्या तरुणीने व्हॉट्सअॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आकाश सिंग नावाच्या व्यक्तीने त्यांना एका बनावट कंपनीत गुंतवणूक करण्यास उद्युक्त करत मोठ्या नफ्याचे अमिष दाखवले. बडगुजर यांनी या आमिषाला बळी पडत वेळोवेळी ५ लाख ६० हजार रुपये गुंतवले. ठगांनी एका अॅपवर त्यांची गुंतवणूक १८ लाख ८५ हजार रुपये झाल्याचे दाखवले. मात्र, जेव्हा बडगुजर यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ते शक्य झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे तपास करत आहेत.कंपनीत गुंतवणुकीवर १८ लाख रुपये नफा मिळाल्याचे खोटे आश्वासन देऊन अमळनेर येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश जानकीराम बडगुजर (वय ७९) यांना ऑनलाइन ठगांनी ५ लाख ६० हजार रुपयांना गंडवले. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकाश बडगुजर हे एसटी महामंडळातून निवृत्त झाले असून, अमळनेर येथे राहतात. १ मे २०२५ रोजी रिधी वमवा नावाच्या तरुणीने व्हॉट्सअॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आकाश सिंग नावाच्या व्यक्तीने त्यांना एका बनावट कंपनीत गुंतवणूक करण्यास उद्युक्त करत मोठ्या नफ्याचे अमिष दाखवले. बडगुजर यांनी या आमिषाला बळी पडत वेळोवेळी ५ लाख ६० हजार रुपये गुंतवले. ठगांनी एका अॅपवर त्यांची गुंतवणूक १८ लाख ८५ हजार रुपये झाल्याचे दाखवले. मात्र, जेव्हा बडगुजर यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ते शक्य झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे तपास करत आहेत.





