अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत; ३१.६४ लाख शेतकऱ्यांना दिलासा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत; ३१.६४ लाख शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई : राज्यात मे महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१.६४ लाख शेतकऱ्यांना एकूण २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित होते.
खरीप २०२५ मधील नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर झाला असून, पहिल्या टप्प्यातील मदत विविध जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
जिल्हानिहाय मदत (कोटी रुपयांत)
हिंगोली : ३.०४ लाख शेतकरी बाधित; २३१.१८ कोटी मदत
बीड : १.१४ लाख शेतकरी बाधित; ५६.७४ कोटी मदत
धाराशिव : २.३४ लाख शेतकरी बाधित; १८९.६१ कोटी मदत
लातूर : ३.८० लाख शेतकरी बाधित; २.३५ कोटी मदत
नाशिक : ७,१०८ शेतकरी बाधित; ३.८२ कोटी मदत
धुळे : ७२ शेतकरी बाधित; २ लाख मदत
नंदुरबार : २५ शेतकरी बाधित; १ लाख मदत
जळगाव : १७,३३२ शेतकरी बाधित; ९.८६ कोटी मदत
अहिल्यानगर : १४० शेतकरी बाधित; ६ लाख मदत
राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांसाठी मदत दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणार आहे.





