अमळनेरात पहाटेच्या सुमारास दरोडा; चौघांनी चाकूचा धाक दाखवून सोने, रोकड लुटली

अमळनेरात पहाटेच्या सुमारास दरोडा; चौघांनी चाकूचा धाक दाखवून सोने, रोकड लुटली
अमळनेर: शहरातील अयोध्यानगर, बंगाली फाईल येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सुमारे ६ तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख लुटल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनुसार, दीपक पुंडलिक पाटील, जे रेल्वेत तांत्रिक म्हणून कार्यरत आहेत, ते पहाटे ५ वाजता कर्तव्यावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांच्या अनुपस्थितीत चार अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील व्यक्तीला चाकू लावला. त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटातून ६ तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख लुटले.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उदय बोरसे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, विनोद सोनवणे आणि सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू करण्यात आला असून, पंचनामा पूर्ण करत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.





