
इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांनी बनवले बीज फटाके
जळगाव श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये इको क्लब तर्फे झाडांच्या बियांपासून बीज फटाके तयार करण्याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले.दिवसेंदिवस वाढत चाललेले वायु प्रदूषण यामुळे फटाक्यांना विरोध होतो.फटाक्यांमुळे होणारे अपघात आणि प्रदूषणाबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी शाळेमधील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना उपशिक्षिका शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना पर्यावरण पूरक बीज फटाके बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.तसेच दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी फटाके वाजवू नयेत यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ ही घेण्यात आली. फटाके फोडण्यापेक्षा फटाकाच्या आकारा मध्ये बनवलेले फटाके कुंडीत लावले तर नवीन रोप तयार होईल त्यामुळे निसर्गाला हनी न पोहोचता निसर्गाचा फायदा होईल असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले





