खान्देशजळगांवसामाजिक

पहिला दिवा माझ्या राजाला” – चेतन आळंदे 

पहिला दिवा माझ्या राजाला” – चेतन आळंदे 

आळंदे आणि मित्रपरिवाराकडून प्रेरणादायी दिवाळी साजरी, शहरभर कौतुकाची दाद

जळगाव – दिवाळी म्हणजे प्रकाश, उत्साह आणि परंपरेचं सुंदर मिश्रण. ह्याच दिवाळीला देशभक्तीची झळाळी देत चेतन भाऊ आळंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर “पहिला दिवा माझ्या राजाला” या संकल्पनेतून दिवाळी साजरी करत आगळीवेगळी सकारात्मक सुरूवात केली.

पुतळा परिसर दीपमाळांनी, फुलांनी आणि रंगोल्यांनी सजवून तेजोमय करण्यात आला होता. “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषात सुंदर दिवा प्रज्वलित करून दिवाळीचा पहिला प्रकाश छत्रपती शिवरायांना अर्पण करण्यात आला. ढोल-ताशे, उत्साह आणि देशभक्तीची भावना यामुळे वातावरण भारावून गेले.

चेतन भाऊ आळंदे म्हणाले, “आपल्या राजाला व आपल्याला स्वराज्य दिलेल्या छत्रपती शिवरायांना दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करणे हा अभिमान आणि संस्कृतीचा सन्मान आहे. ही फक्त दिवाळी नसून आपल्या इतिहासाशी असलेली नाळ जपण्याचा आनंदी प्रयत्न आहे.”

या उपक्रमात सहभागी तरुणांनी एकच संदेश दिला – दिवाळी फटाक्यांनीच नाही, तर संस्कार, परंपरा आणि देशभक्तीने साजरी केली तरच सणाचं खरं सौंदर्य उजळतं. या सुंदर उपक्रमाचं शहरात सर्वत्र कौतुक होत आहे आणि अनेकांनी ही सकारात्मक परंपरा पुढेही सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button