
एआयएमआयएमच्या जळगाव शहराध्यक्षपदी सानीर सय्यद यांची नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी ; संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातील विशेष बैठकीत एआयएमआयएम पक्षाच्या जलगाव शहराध्यक्षपदी सानीर सय्यद यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र सरचिटणीस समीर साजिद बिल्डर आणि जिल्हा पर्यवेक्षक शारिक नकशबंदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सानीर सय्यद यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात एआयएमआयएमच्या विद्यार्थी आघाडीतून केली होती. विद्यार्थी संघटनेचे पहिले उत्तर महाफष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत युवकांना संघटित करण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनती, प्रामाणिकपणा आणि पक्षनिष्ठेच्या कामगिरीच्या आधारावर त्यांना आता जलगाव शहराध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष जिया बागवान, डॉ. कुणाल खरात (अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यार्थी संघटना), नगरसेवक रियाज बागवान, नगरसेवक हाजी युसुफ, खालिद खाटीक, जुबेर देशमुख, एरंडोल अध्यक्ष शाकीर सर, भडगाव येथील शकील सदस्य, पाचोरा अध्यक्ष डॉ. अकील, जामनेर अध्यक्ष मुदस्सीर पटेल तसेच फैजान खाटीक, समीर मुल्ला, अस्लम शेख, मुख्तार भाई, सनीर शेख, अबरार शेख, सैम शेख, हंजला खान, काशिफ शेख, परवेज शेख, डॉ. फैसल शेख, अहतेशाम शेख, फरहान शेख, वासे भाई, जियाउद्दीन शेख, इलियास बागवान, जुनैद शेख, फैसल शेख, शोएब सय्यद, नाजीम शेख, झोएब शेख, इम्रान बागवान, अरबाज खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या नियुक्तीमुळे जजळगावशहरातील एआयएमआयएम कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्ष संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सानीर सय्यद यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





