मुक्ताईनगर ;- मुक्ताईनगर तहसीलचे काउंटिंग हॉलमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी यांचे उपस्थितीत आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता व सायंकाळी 4 वाजता अधिकारी यांची बैठक घेऊन नुकतेच वादळी पाऊस व अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या बाबत व पुरवठा विभागातील धान्य वितरण तसेच पीएम किसान योजना मधील लाभार्थींना लाभ मिळावा याबाबत महसूल व कृषी विभागाची संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला.
त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी बांधव यांचे वादळी पावसात झालेल्या पिकाचे नुकसान यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना शासनामार्फत आर्थिक मदत तातडीने मिळाली पाहिजे याबद्दल अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच अनेक घरकुलांचे कामे पूर्ण होऊन देखील त्यांचे हप्ते वेळेवर टाकले जात नाही शौचालयाची बांधकाम पूर्ण होऊन देखील आर्थिक मदत मिळत नाही याबाबत बैठकीत ग्रामीण भागातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या त्याबाबत गटविकास अधिकारी यांना सूचना करून त्वरित योग्य लाभार्थी यांना लाभ मिळावा असे सुचित केले.
सुळे येथील ग्रामसेवक सुमारे 6 महिन्यापासून ग्रामपंचायतला आले नाही घरकुल व शौचालय बांधकामचे हप्ते वेळेवर पडत नाही याबाबत ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस द्या कुणाचीही गय करू नका अन्यथा कायदेशीर कार्यवाही करा असे निर्देश बी डी ओ मॅडमला आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले तसेच आमदारांनी समस्यांचे निराकरण करण्याची ग्याही देत जनहितांच्या कामांना गती देण्याचे निर्देश अधिकारी वर्गाला दिले सदर बैठकीत प्रभारी तहसीलदार डॉक्टर अनिकेत वाळे बी डि ओ मॅडम आमदार पीए प्रवीण चौधरी महेंद्र मुंढाळे नवनीत पाटील पंकज राणे पियुष महाजन ग्रामीण भागातील सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी मंडळ अधिकारी ग्रामसेविका विस्तार अधिकारी कृषी अधिकारी विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते सदरू बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवराज आढागळे साहेब विस्तार अधिकारी यांनी केले.