
एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग
लाखोंचे नुकसान ; ६ ते ७ अग्निशामक बाबांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न
जळगाव प्रतिनिधी ;– एमआयडीसी मधील आर एल चौफुलीजवळ जी सेक्टरमधील आर्यव्रत नावाच्या केमिकल कंपनीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी महानगरपालिकेच्या ५ ते ६ बंबांद्वारे आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे . आगीत नेमके किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नसून सुदैवाने जीवितहानी न झाल्याचे वृत्त समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी संफीतले कि आग इतकी भयानक होती कि ४ ते ५ किलोमीटर परिसरातून अग्नीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता . हि घटना घडल्याची माहिती कळताच पोलिसदेखील दाखल झाले आहेत . आग विझविण्याचे काम अद्याप सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




