पाचोरा ;- गोंडगाव ता. भडगाव येथील घटनेतील आरोपी विरुध्द जलदगती न्यायालयात अॅड. उज्वल निकम यांना खटल्याचे काम देवुन आरोपीस २५ आॅगस्ट पर्यंत निर्णय न आल्यास २६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पाचोरा दौऱ्यावर येत असल्याने त्यांना घेराव घालणार व एका लोकप्रतिनिधीने पत्रकाराला केलेली शिवीगाळ व ९ आॅगस्ट रोजी पत्रकाराला झालेली मारहाण ह्या घटना लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे निषेध करत आहेत. अशी माहिती शहरातील “शिवतीर्थ” या शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी दिली.
याप्रसंगी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख रमेश बाफना, अॅड. अभय पाटील, भरत खंडेलवाल, पप्पु राजपुत उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देतांना वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, एका लोकप्रतिनिधी यांनी पत्रकाराला केलेली शिवीगाळ ही अशोभनीय असुन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अशी शिकवण दिलेली नाही. या प्रकरणात पत्रकाराला झालेली शिवीगाळ व मारहाण हे देखील एक अशोभनीय कृत्य आहे. या घटनांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे निषेध करण्यात येत आहे.