खान्देश

कासोदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवडे बाजार बंद

कासोदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवडे बाजार बंद

जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कासोदा (ता. एरंडोल) येथे मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १४ एप्रिल रोजी चा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर भिमगीतांचा कार्यक्रम तसेच अन्य सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो त्याच परिसरात हे कार्यक्रम होणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या दिवशी आठवडे बाजाराच्या निमित्ताने आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने लोक बाजारासाठी कासोदा येथे येत असतात. त्यामुळे बाजाराची गर्दी,मिरवणूक व कार्यक्रची गर्दी या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अधिनियम १८६२ च्या कलम ५ (अ) व (क) अन्वये अधिकार वापरून आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हा आठवडे बाजार दुसऱ्या दिवशी अथवा सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा असेही आदेशात नमूद केले आहे.
*********

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button