जळगाव ;- शहरातील तांबापूर शहीद अब्दुल हमीद चौकात 15 ऑगस्ट रोजी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . मदिना चौक तांबापूर ते बिलाल चौक शहीद अब्दुल हमीद चौकापर्यंत शाहे औलिया मशिदीच्या मदरशातील मुलांची तिरंगा रॅली काढण्यात आली.
जळगाव शहरात दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तांबापूर शहीद अब्दुल हमीद चौकात कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण मांडण्यात आले, सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी मुलांना मिठाई चे वाटप करण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीते आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शहीद अब्दुल हमीद चौकात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होताकार्यक्रमाला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सय्यद इम्रान, नाना तायडे, इम्रान बाग, किरण पाटील, आदी उपस्थित होते. शेवटी शाह ओलिया मशिदीचे मौलाना हनीफ शाह बापू आणि इमाम साहिब यांनी मार्गदर्शन केले.