खान्देशजळगांवसामाजिक

डाक अदालत २ सप्टेंबर रोजी; तक्रारी २६ ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे आवाहन

डाक अदालत २ सप्टेंबर रोजी; तक्रारी २६ ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे आवाहन

जळगाव,: पोस्टाच्या सेवांबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करण्यासाठी पोस्ट विभागातर्फे वेळोवेळी डाक अदालत आयोजित करण्यात येते.

अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्यातर्फे दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

पोस्टाच्या कामासंबंधी ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची डाक अदालतीत दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक, मनीऑर्डर आदी सेवांबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.

तक्रारीमध्ये सर्व तपशील नमूद करणे आवश्यक असून, तक्रार कोणत्या तारखेला व कोणत्या अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा आदी माहिती नमूद करावी.

संबंधितांनी डाकसेवेसंबंधीची तक्रार दोन प्रतीत, अतिरिक्त प्रतीसह टी. एफ. तडवी, सहाय्यक अधीक्षक (मुख्यालय), अधीक्षक डाकघर यांचे कार्यालय, १ ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव – ४२५००१ या पत्त्यावर दि. २६ ऑगस्ट २०२६ पर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी.
दि. २६ ऑगस्टनंतर प्राप्त झालेल्या तक्रारींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल; मात्र त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही, असे अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button