आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा कार्यकर्ता मेळावा

खान्देश टाईम्स न्यूज l २० ऑगस्ट २०२३ l रविवार रोजी ११ वाजता न्यु भुषण मंगल कार्यालय भडगाव रोड चाळीसगाव येथे आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री श्री डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे आदिवासी नेते
प्रभाकर अप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या मेळावात आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती राज्य संघटक प्रशांत भाऊ तराळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे मा. रमेशजी गाले साहेब रिटायर बैंक मॅनेजर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अण्णासाहेब फुणगे जळगाव जिल्हा पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संजय भाऊ कांडेलकर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष रविन्द्र शेठ नन्नवरे
प्रमुख पाहूणे आहेत.
मेळाव्याचे आयोजन आदिवासी कोळी महासंघ चाळीसगाव
तालूका अध्यक्ष संजयकुमार सोनवणे तालूका
उपाध्यक्ष दशरथ शेवरे शहर अध्यक्ष सदाशिव झोडगे शहर उपाध्यक्ष राहुल कोळी यांनी केले आहे यावेळी जिल्हा मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे जिल्हा उपाध्यक्ष शंभाजी अण्णा शेवरे अनिल दादा सावळे महासचिव मनोहर कोळी जळगाव महानगर अध्यक्ष किशोर भाऊ बाविस्कर नंदुरबार जिल्हाध्यक्ष भाऊराव बागुल साहेब प्रसिद्धि प्रमुख शैलेन्द्र सोनवणे कर्मचारी जिल्हाध्यक्ष मंगल कांडेलकर कोषाध्यक्ष सुरेश नन्नवरे महिला जिल्हाध्यक्षा सुनिताताई तायडे , शोभाताई कोळी संघटन सचिव जितेन्द्र कोळी यांच्यासह इतर मान्यवर प्रमुख पाहुणे असतील.
या मेळाव्यात माजी मंत्री डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारींना नियुक्त पत्र देण्यात येणार आहे. आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी यांच्यासह इतर आदिवासी जमातींना आदिवासी विभाग व पडताळणी समिती अनुसूचित जमातीचे जात प्रमाण पत्र वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहे आपल्या आदिवासी कोळी समाजाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत नविन नोकरी भरती करण्यात आलेल्या मुलांना अधिसंख्य पदावर वर्ग केलेले आहेत त्यामुळे सर्व आदिवासी कोळी समाजाचे अतोनात नुकसान होत आहे जो पर्यंत आपले जात प्रमाण पत्र वैधता प्रमाण पत्र कुठलीही अट न घालता रितसर सरसकट देण्यात येणार नाही तो पर्यंत आपल्या समाजाला संवेधानिक घटना बाहय न्याय मिळणार नाही सर्व प्रकारचे शैक्षणिक दावे व कर्मचारी बांधव नोकरी करीत असतांना दाखल केलेले सर्व प्रकारचे दावे रितसर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यन्त आपला न्याय हक्क अधिकारासाठी
संघर्ष सुरूच राहील सर्व समाज बांधवांनी एक कोळी कोटी कोळी संख्येने या समाज कार्यात्मक लढयात सहभागी होवून योगदान दयावे.
दि. २० ऑगस्ट रविवार रोजी ११ वाजता चाळीसगाव
जिल्हा जळगाव येथे आदिवासी कोळी महासंघ पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे जाहिर आवाहन आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते समाजबांधव यांच्या कडून करण्यात आले आहे.