जळगाव l २ स्प्टेंबर २०२३ l के.सी. ई. सोसायटिचे आय. एम.आर. जळगांव येथे दि. २२आँगस्ट ते ३१ आँगस्टच्या दरम्यान बी. सी. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी आठ दिवसीय हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर (पी. एच. पी) टेक्नॉलॉजीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
टेक्नोव्हेट सॉफ़्टवेअर या आय. टी. कंपनीचे संस्थापक , आशिष बेंडाळे, यांनी हे प्रशिक्षण बी. सी. ए. विद्यार्थ्यांना दिले.
विद्यार्थ्यांमध्ये वेब डेव्हलपमेंट्ची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पहील्या दिवशी पी.एच. पी. टेक्नॉलॉजीची तोंडओळख करुन देत, त्यांनी पी.एच. पी. ह्या संगणकीय प्रणालीचे विविध पैलु, जसे वेगवेगळे वेब सर्व्हर, बिल्डिंग फ़ॉर्म्स, युझिंग डाटा बेसेस, उप्स कन्सेप्ट्स इत्यादि वर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातुन प्रशिक्षण दिले.
ह्या प्रशिक्षणातुन त्यांनी विद्यार्थ्यांकडुन नवनविन व्यवहारोपयोगि छोटे छोटे वेब बेस्ड प्रोजेक्ट्स तयार करुन घेतले. प्रात्यक्षिक करत करत प्रशिक्षणाच्या या आठ दिवसात, फ़ूड डिलिव्हरी वेबसाईट, एम्प्लॉई लिव्ह मॅनेजमेंट वेब ऍप्लिकेशन, हॉस्पिटल अपॉइंट्मेंट प्लानिंग वेब ऍप्लिकेशन इत्यादि छोट्या छोट्या प्रोजेक्ट वर विद्यार्थ्यांनी काम केले. असे प्रात्यक्षिका सोबत घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग़ आम्हाला नक्की होइल असे मत विद्यार्थ्यांनी मांडले.
प्रा. श्री. सतिश दमाडे यांनी ह्या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन काम केले. बी. सी. ए. च्या समन्वयिका प्रा. श्वेता फ़ेग़डे यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले. संस्थेच्या संचालक प्रो. डॉ. शिल्पा बेंडाळे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रोत्साहन दिले. ह्यापुढेही असेच कार्यक्रम घेण्याचा मानस या प्रसंगी ऍकाडमिक डीन डॉ. तनुजा फ़ेग़डे यांनी बोलुन दाखवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , प्रा. शमायला शेख, प्रा. पूजा पाटील आणि पूनम पाटील ह्यांनी प्रत्यक्ष सहभागातून परिश्रम घेतले.