जळगाव :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या नेहरू चषक हॉकी स्पर्धा जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत रविवारी झालेल्या १७ वर्षातील मुलांच्या गटात बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ ने बी झेड उर्दू हायस्कूल भुसावळ चा ३-० ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले.
अशाप्रकारे नेहरू चषक स्पर्धेत बियाणी पब्लिक स्कूल ने १५ वर्ष आतील मुलांच्या गटात,१७ वर्षा आतील मुलींच्या गटात व आज १७ वर्षा आतील मुलांच्या गटात विजय संपादन करून तिहेरी मुकुट मिळवलेला आहे.
या संघाना चषक देण्यासाठी जळगाव मेमन बिरादरीचे जिल्हाध्यक्ष कादर कच्ची, महाराष्ट्र हॉकीच्या च्या उपाध्यक्ष डॉक्टर अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, उपाध्यक्ष निवेदिता ताठे, संचालिका वर्षा सोनवणे,सत्यनारायण पवार व क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांची उपस्थिती होती.
तृतीय क्रमांक एम आय तेली शाळा भुसावळने पटकाविला त्यांना सुधा पदक देऊन गौरविण्यात आले.
विजयी व उप विजयी संघांना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे पारितोषिक देण्यात आले.