खान्देशगुन्हेजळगांव

जिल्ह्यासह परजिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक

दुचाकी हस्तगत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव-;- जळगाव जिल्ह्यासहसह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीच्या एमआयडीसी पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पोलीसांनी चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याआहेत . तर एका अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात आहेत .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसीतील राम दालमिल कंपनीच्या गेटसमोरून भुषण दिलीप पाटील रा. जुने जळगाव यांची २९ जुलै रोजी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीवाय ८४९०) चोरट्यांनी चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान मेहरूण परिसरातील काही तरूण बाहेरगावाहून महागड्या दुचाकी चोरून आणून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. गुन्हे शोध पथकाने मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत संशयित आरोपी दानीश शेख कलीम वय-२० रा. पिरजादेवाडा मेहरूण, सोमनाथ जगदीश खत्री वय-२१ रा. जोशीवाडा मेहरूण, आवेश बाबुलाल पिंजारी वय-२० रा. मेहरूण आणि एक अल्पवयीन मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या ९ दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्यांनी जळगाव, छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि बीड जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, योगेश बारी, किशोर पाटील, सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button