जळगांव ;-नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष शिबिर घेतले जात आहेत. यासाठी जळगाव जिल्ह्यात 1159 ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या विशेष ग्रामसभेत जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी एका गावात या सभेला उपस्थित राहून मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले. मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्यासाठी मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रारूप मतदार यादीतील आवश्यक दुरुस्ती व नव मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 1159 ग्रामपंचायती मध्ये एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी प्रारूप मतदार यादीचे वाचन करण्यात आले भुसावळ तालुक्यातील विशेष ग्रामसभेला जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी भेट देवून पाहणी केली.
जळगांव जिल्हयात 04 व 05 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबीरामध्ये 10 चोपडा विधानसभा मतदारसंघात 267 11 रावेर विधानसभा मतदारसंघात 522 12 भुसावळ विधानसभा मतदारसंघात 444, 13 • जळगांव शहर विधानसभा मतदारसंघात 204, 14 -जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात – 677, 15 अमळनेर विधानसभा मतदारसंघात 332, 16 एरंडोल विधानसभा मतदारसंघात 166, 17 चाळीसगांव विधानसभा मतदारसंघात 560, 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघात 556, 19 जामनेर विधानसभा मतदारसंघात 312. 20 – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात 137 नागरिकांनी मतदार नोंदणी दुरुस्ती नाव व पत्ता बद्दल वगळणी आधार जोडणीसाठी विविध नमुने भरून अर्ज सादर केले जिल्हाभर झालेल्या या विशेष ग्रामसभेत / शिबिरामध्ये नव मतदारसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक 18 व 19 नोव्हेंबर तसेच 02 व 03 डिसेंबर, 2023 ला विशेष शिबिरांचे आयोजन
पुढील टप्प्यात दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी विदयार्थी, महिला व दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केलेले आहे. तसेच दिनांक 25 व 26 नोव्हेंबर तृतीय पंथीय, महिला सेक्स वर्कर व भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तीसाठी विशेष शिबीरे आयोजीत करणेत येणार आहे. या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीसह उपस्थित राहणार आहे. मतदारांनी आपल्या नावाच्या नोंदणीसह नावे तपासणी, वगळणे, दुरुस्ती करणे, आधार जोडणीसाठी केंद्रावर उपस्थित रहावे. मतदार याद्या अधिक अद्यावत करण्यासोबतच जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.