खान्देशजळगांवराजकीयशासकीय

राजकीय भूकंप : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुती प्रबळ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button