जळगांव(प्रतिनिधी) – जळगांव जिल्हा बाल संरक्षण समिती नुतकीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा आदेशाने गठीत करण्यात आली.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण)अधिनियम २०१५ च्या कलम ४४ व ४५ तसेच नियम २०१८ मधील २५ नुसार प्रतिपालकत्व,२६ नुसार प्रायोजकत्व व अनुरक्षण या योजने बाबत तरतूद केली आहे.योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रतिपालकत्व , प्रायोजकत्व तसेच अनुरक्षणगृह संस्थेतर सेवांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुणे आयुक्त यांचा निर्देशानुसार नुकतीच समिती गठीत करण्यात आली.या समितीत अध्यक्ष, सचिव व ५ सदस्यांचा समावेश आहे.
या समितीत मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
फिरोज शेख यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या माध्यमातून बाल संरक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांना जिल्हा बाल संरक्षण समितीचे तथा जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्रही प्राप्त झाले आहे.
या निवडी बद्दल फिरोज शेख यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.