इतर

अमळनेर शहरात संचारबंदी लागू !

जळगांव l अंमळनेर l ०९ जून २०२३ रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात दि. १० जून २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून ते १२ जून २०३३ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत आली आहे. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करण्यात येईल. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button