लाखो रुग्णांनी घेतला उपचार ; ॲम्बुलन्स सेवेने भारावले शिवभक्त
जळगाव ;- जळगाव तालुका नजीक असलेल्या वडनगरी कानडदा रोड येथील श्री बडे जटाधारी मंदिर आयोजित महाकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण महा कथेचे आयोजन करण्यात आले होते. रेकॉर्ड तोड गर्दी शिवमहापुराणकतेदरम्यान झाली असताना नामदार गिरीश महाजन वैद्यकीय मदत कक्ष लाखो शिवभक्तांसाठी संजीवनी ठरले आहे. वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून 24 तास अखंड रुग्णसेवा नामदार गिरीश महाजन वैद्यकीय मदत कक्षा च्यामाध्यमातून देण्यात आली आहे.
लाखो रुग्णांनी घेतलेला लाभ
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून आयोजित शिव महापुराण कथेमध्ये आमदार गिरीश महाजन वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एकूण दोन लाख 63 हजार शिवभक्तांना वैद्यकीय उपचार विनामूल्य देण्यात आला आहे. यामध्ये औषधी इंजेक्शन तसेच अत्यावश्यक रुग्णासाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये 24 तास तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी मध्ये शिवभक्तांना वैद्यकीय उपचार देण्यात आला आहे. अध्यक्ष रुग्णांसाठी एकूण दहा रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाचे दोनशे स्वयंसेवकांनी रात्रंदिवस सेवा देऊन शिव कार्याला आरोग्यदायी हातभार लावण्याचा पुण्यवान कार्य केले आहे.
आणि उडाली धावपळ
शिव पुरण कथे दरम्यान पाणी कमी पिल्याने अनेक शिवभक्तांना मोठ्या प्रमाणात ऍसिडिटी तसेच छातीत कळाल्याच्या त्रासाला समोर जावे लागले आहे. शिव कथेच्या शेवटच्या दिवशी अचानकपणे बुलढाणा येथील एका वृद्ध महिलेला अचानकपणे छातीत कळ आल्याने वेदना होऊ लागल्या. घटनेची माहिती काढतात तात्काळ नामदार गिरीश महाजन वैद्यकीय मदत पक्षाच्या स्वयंसेवकांनी धावपळ करीत मध्यवर्ती भागात मंडपात असलेल्या वृद्ध महिलेला तात्काळ वैद्यकीय मदत कक्ष क्रमांक दोन मध्ये आलं उपचार सुरू केल्यामुळे वृद्ध महिलेला वैद्यकीय मदत पक्षाच्या रुग्णवाहिकेमधून तात्काळ जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यादरम्यान वृद्ध मातेला होणारा त्रास काही प्रमाणात उपचार उपलब्ध झाल्यामुळे कमी झाला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वृद्ध मातेला कथा ऐकण्यासाठी इच्छा असल्यामुळे पुन्हा कथेच्या प्रांगणात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
शिव कथा सुरू असताना लाखो जनसमुदायाच्या गर्दीमध्ये श्रद्धे पोटी स्वच्छतागृहाला जाणे टाळल्याने त्यामुळे अनेकांना पोटदुखी , मूत्राशयाचा तसेच चक्कर येण्याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहे. मात्र नामदार गिरीश महाजन वैद्यकीय मदत कक्षाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा देत असताना मेहनत घेतल्यामुळे शिवभक्तांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिवभक्तांना वैद्यकीय उपलब्ध व्हावा यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार नामदार गिरीश महाजन वैद्यकीय मदत कक्षाच्या यशस्वीतेसाठी मुख्यतः जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक व गिरीश भाऊ महाजन यांचे विश्वासू सहकारी अरविंद देशमुख यांनी विशेष नियोजन केले होते. त्यांच्या देखरेखीत मध्ये संपूर्ण वैद्यकीय मदत कक्षाचे कटाक्षाने नियोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय मदत कक्षाच्या यशस्वीतेसाठी डॉ क्षितिज भालेराव,भूषण भोळे, अमय राणे,राहुल पाटील, मुविकोराज कोल्हे,रुपेश ठाकूर,तुषार चौधरी, साहिल देशमुख, श्याम पाटील,विजय जगताप , विनय मेश्राम, जितेंद्र चौथे, शेखर चौधरी, मुकेश पाटील,कल्पेश कासार,योगेश चौधरी,पप्पू चौधरी,दुर्गेश चौधरी,ओम चौधरी,मयूर राणे,सुधीर मेश्राम या सह प्रमुख स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आहे.