जळगाव ;- सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पिडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरात आयएमआर महाविद्यालयाच्या परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी शिक्षणासाठी वास्तव्याला आहे. पिडीत विद्यार्थींनी आणि १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी हे एका खाजगी क्लासेसमध्ये जेईई परिक्षेची तयारी करण्यासाठी क्लास लावलेला होता. जुलै २०२२ पासून ते मार्च २०२३ पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पिडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शरीरीक संबंध केले. दरम्यान, हा प्रकार पिडीत विद्यार्थींनीला सहन न झाल्याने तिने थेट जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता
याप्रकरणी भा.दं.वि कलम 376 (2) (छ), 506, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.