जळगव ;– गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ.विजयकुमार पाटील (प्राचार्य), सौ.नीलिमा चौधरी, प्रमोद भिरुड, प्रा. एन. जी. चौधरी तसेच गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्या संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले व नृत्य कलाविष्कार, एकांकिका, देशभक्तीपर गीते,कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थी ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात व संशोधनात अतुलनीय कामगिरी करत असताना उत्कृष्ट पारितोषिक मिळवलीत त्यांच्याबद्दल गौरवाचे उद्गार काढले. तसेच त्यांनी विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग यांनी मिळवलेल्या पेटंट संदर्भात माहिती देताना त्यांचे अभिनंदन केले.
तसेच येणार्या काही वर्षांमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अधिक विकास होऊन अमुलाग्र बदल घडतील असे सांगितले. गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी उत्कृष्ट कलाकृती सादर करणार्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या मंचावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्यामुळे त्यांच्यामध्ये गुणवैशिष्ट्ये वाढीस लागतात व भविष्यात याच गोष्टीचा फायदा होतो हे त्यांनी नमूद केले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले.त्यानंतर महाविद्यालय परिसरामध्ये डॉ.उल्हास पाटील सर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त कमालीचा उत्साह जाणवला व सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने व शिस्तीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला.समारोप वंदे मातरम या गीताने झाला.
==============================