जळगाव ;- शहरातील बळीराम पेठ येथे शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या घटने मुले खलबल उडाली आहे . याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला आहे.
याबाबत महाराष्ट्र बँकेमधून निवृत्त झालेल्या चित्रा मोहरील या बळीराम पेठेतील शिवप्रसाद अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात.
शनिवारी दुपारी त्यांच्या भावजयीसोबत घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. महिलेने जमा करून ठेवलेल्या ५० हजार रुपये रकमेच्या कोऱ्या करकरीत नोटा, सोन्याच्या बांगड्या, चांदीच्या मूर्ती, शिक्के असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. संध्याकाळी पाच वाजता मोहरील घरी आल्या त्या वेळी ही चोरी लक्षात आली. त्या वेळी त्यांनी पहिल्या मजल्यावर राहणारे आशीष जोग यांना या विषयी माहिती दिली. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भर दिवसा एक चोरटा अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर पोहचला व त्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला, हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून दुपारी ४:०२ वाजता आला व ४:३१वाजता बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तब्बल २९ मिनिटे तो घरात होता.