जळगाव : जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत रविंद्र उर्फ चिन्या रमेश जगताप याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती, तर दोन जण फरार होते. यातील संशयित हा पोलिसांना गुंगारा देत होता, दरम्यान, तो आकाशवाणी चौकात येताच जिल्हापेठ पोलिसांनी संशयित तुरुंग अधिकारी जितेंद्र शेनपडू माळी (वय ४५, रा. शेलवड, ता. बोदवड) यांना अटक केली आहे.
विंद्र उर्फ चिन्या रमेश जगताप याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारागृह अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आण्णा किसन काकड (वय ५२, रा. पानेवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक), अरविंद प्रकाश पाटील (वय ३८, रा.
चाळीसगाव, दत्ता हनुमंत खोत (वय २५, रा. गोसावी वाडी पो, अंबी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोन संशयित फरार होते. या संशयीतांना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्हापेठ पो.नि.डॉ. जयस्वाल यांना दिल्या. त्यानुसार त्यांनी पोहेकॉ सलीम तडवी, मिलींद सोनवणे, विनोद पाटील, समाधान पाटील, विकास पहुरकर यांचे पथक रवाना केले. पोलिसांच्या
संशयित फरार तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, तसेच तो पोलिसांच्या पथकाला गुंगारा देत होता. हा संशयित आकाशवाणी चौकात आल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी अटक केली.