जळगाव ;- फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला रविवार १० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शिव कॉलनी रिक्षा स्टॊपजवळ घडली .मनपाच्या ७ बंबानी आग आटोक्यात आणली . . याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा रा. शिवधाम मंदीर, जळगाव याचे विल्स फर्निचर दुकान आहे. याठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट, देव्हारा , खुर्ची, कपाट आदि साहित्य बनविले जाते. दुकानाच्या बाजूला देवकिरण विलास पाटील रा. निवृत्ती नगर, जळगाव याचे कार वाशिंग सेंटर आहे. रविवारी १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता फर्निचर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत विल्स फर्निचर दुकान आणि वाशिंग सेंटर मधील साहित्य जळून खाक झाले आहे. यात विल्स दुकानात असलेले सागवान लाकूड, मशिनरी व तयार वस्तू जळून अंदाजे १५ लाखांचे नुकसान झाले तर वाशिंग सेंटर मधील कार वाशिंग मशिन, व्हक्यूम क्लीनअर मशिनी, कोटींग मशिन, फर्निचर आदी असा अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे .
आग लागल्याची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे एकुण ७ अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. व आग विझविण्यात आली. दरम्यान याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानुसार अकस्मात आगीची नोंद करण्या आहे.