देश-विदेशशासकीय

निवडणूक आयोगाने दिले सहा राज्यांतील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली ;- सहा राज्यांतील गृहसचिवांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हटविण्याचे आदेश दिले असून यात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या गृहसचिवांचा समावेश आहे. . त्याचबरोबर मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) हटवण्यासाठी आवश्यक कारवाई देखील केली आहे.

निवडणुकांमध्ये समतोल राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या कार्यवाहीमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळणार आहे, असा संदेश गेला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनाही हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर मिझोराम आणि हिमाचल प्रदेशचे जीएडी सचिवही हटवण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button