जळगाव;- मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्ताचा लिलाव करण्यात येणार असून त्यांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी उताऱ्यानुसार बांधीव व खुले क्षेत्र किती याचे मोजमाप करण्यात येणार आहे. त्यानंतर नगररचना विभागाकडून संबधित मालमत्तांचे मुल्यांकन केले जाणार असून मूल्यांकन निश्चित झाल्यानंतर लिलावाची तारीख निश्चित ठरणार आहे .
यामालमत्ताधारकांकडे १ कोटी ४५ लाखाची थकबाकी आहे. थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय शास्ती योजना राबविली. या योजनेला वारंवार मुदतवाढही देण्यात आली. थकबाकीदारांनी कराचा भरणा करावा व पुढील कारवाई टळावी हा त्यामागचा हेतू आहे, मात्र तरी देखील अनेक जणांना भरणाच केला नाही. ४०० पेक्षा जास्त जणांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेऊन त्यांना जप्तीचे बंधपत्र बजावण्यात आले. त्यानंतर काही जणांनी कराचा भरणा केला. अंतिम क्षणापर्यंत ५६ जण थकबाकीदार राहिले असून त्यांच्या मालमत्तांचा आता लिलाव करणे हाच पर्याय उरला आहे. या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचे उतारे मुल्यांकनासाठी नगररचना विभागात पाठविण्यात आले होते,