इकरा थीम कॉलेजमध्ये प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त जळगावच्या इकरा शैक्षणिक संस्था संचालित एचजे थीम सीनियर कॉलेजच्या हिंदी व उर्दू विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रेमचंद यांचे व्यक्तिमत्व आणि सर्जनशीलता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.चांद खान होते.
चर्चासत्रात हुमेरा नाज, जवेरिया तहरीम, सुहाना शेख, नाजमीन मेहमूद, मसिरा परवीन, अर्शिया अंजुम, पीरजादे उजमा, जबीन आदी विद्यार्थ्यांनी प्रेमचंद यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कार्यावर संशोधनात्मक निबंध सादर केले. कार्यक्रमात प्रा.मुझम्मील काझी, डॉ.अंजली कुलकर्णी, प्रा.राजेश भामरे, डॉ.काहक्षा अंजुम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चांद खान यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, प्रेमचंद यांनी वास्तववादी साहित्य लिहून सामान्य माणसाला आपल्या साहित्यात नायक बनवले. प्रेमचंद यांचे साहित्य आजही प्रासंगिक आहे. शेतकरी जीवनाचे प्रश्न, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समस्या प्रेमचंद यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू विभाग प्रमुख डॉ.काहेक्षा अंजुम यांनी केले तर हिंदी विभाग प्रमुख प्रा.राजेश भामरे यांनी आभार मानले.